पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पी एम पी च्या स्वारगेट आगारात चालक पदावर कार्यरत असलेले अण्णा राजाराम जेठे यांचा मुलगा किशोर जेठे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2021 मध्ये घेतलेल्या परिक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ‘क्लास-वन’ अधिकारीपदी निवड झाली आहे.

प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते की आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा यासाठी ते रात्रंदिवस काबाडकष्ट करतात आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट पुरवतात यावर एकच अपेक्षा असते की मुलांनी याचे चीज करावे.किशोरने आपल्या वडिलांची इच्छा सार्थ ठरवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *