पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) फुरसुंगी गावातील एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह आळंदी म्हातोबा येथील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आली आहे लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे
मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील एक महिला आपल्या दोन वर्षांच्या मुलासह गायब झाली याविषयी हडपसर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती यावर तपास सुरू असताना आळंदी म्हातोबा येथील शितोळे वस्ती परिसरात असलेल्या शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह स्थानिकांना दिसला यावर याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर तिच्या जवळच आणखी एक छोट्या मुलांचाही मृतदेह असल्याचे आढळून आले. ही बातमी परिसरात कळल्यावर नागरिकांत मोठी हळहळ व्यक्त केली जात होती.ही महिला आपल्या मुलास घेऊन गावात फिरताना आळंदीतील ग्रामस्थांनी पाहिले होते दरम्यान या महिलेने परिसरातील विहीर पाहून पायातील चप्पल व पर्स मोबाईल विहिरीच्या काठावर ठेऊन विहिरीत उडी घेतली
हडपसर पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत घरातून गायब झालेल्या महिलेचे नाव कविता देविदास भोसले वय ३० व मुलगा प्रणित वय २ असे आहे.आळंदीत सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन जुळणारे असल्याने ती खात्री पटली.
या महिलेने आपल्या छोट्या मुलासह आत्महत्या का केली याचे कारण अस्पस्ट असून लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी पुढील तपास करीत आहेत.
