पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)   आपण बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लोकांना अघोरी उपाय करून त्यांच्याकडून पैसे लुटणाऱ्या भोंदूबाबा मनोहर उर्फ मामा भोसले यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत त्यास जेरबंद केले. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चार टन कायदा २०१३ चे कलम ३,२ औषध चमत्कारी उपाय अधिनियम व नियम १९५४ चे कलम ७ नुसार बारामती येथे गुन्हा  दाखल झाला होता.
               बारामती येथील शशिकांत सुभाष खरात  यांना  मनोहर भोसले याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचे बनाव करून त्यांच्या वडिलांचा गळ्यातील थायराईड कॅन्सर बरा करतो असे सांगून बाभळीचा पाला, साखर व भंडारा खाण्यास देऊन विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा वनकर शिंदे यांच्यासोबत संगणमत करून वेळोवेळी पैशाची मागणी करत एकूण दोन लाख ५१ हजार पाचशे रुपये हे जीविताची भीती घालून देण्यास भाग पाडले व फसवणूक केली व पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली
        वरील गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक नेमले होते  गुन्ह्यातील आरोपी यांचा या पथकाने शोध घेऊन मनोहर उर्फ मामा भोसले सातारा जिल्ह्यातील सालपे गावातून अटक करण्यात आली आहे .
             ही कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते बारामती विभाग प्रमुख नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा पोलिस निरीक्षक संदीप येळे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,
पोलीस हवालदार  विजय कांचन, अजय घुले, राजू मोमीन पोलीस शिपाई धिरज जाधव यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *