लोणी-काळभोर [हवेलीनामा वृत्तसमुह] संस्कार हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे आणि याची सुरुवात होते ती आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यामुळेच आपल्याकडे या कालावधीत संस्कारक्षम पुस्तकांबरोबरच चांगले सात्विक भोजन देण्याची परंपरा आहे.मग अशा पालकांचे उतराई होण्यासाठी बालकांकडून काही केल गेल तर हा देखील एक त्याचाच भाग ठरतो.अलिकडे याकडे दुर्लक्ष होताना दिसतय,पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब होत असल्याने हे सर्व परिणाम दिसून येत आहेत परंतु काही शाळांमधून या संस्काराचे धडे सतत गिरवले जात असल्याचे दिसून येतात.

असाच एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती येथे मातृपितृ पुजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.ह भ प स्वप्निल महाराज यांच्या संकल्पनेतून याचे एकादशीच्या मुहुर्तावर आयोजन करण्यात आले होते,यावेळी शाळेचा परिसर या प्रेमळ प्रसंगाने बहरून निघाला होता.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी जगधने, नवनाथ पानमंद, उषा बोर्डे, सचिन कराड, महेश पवार, सिमा साबळे, सोनाली खंडाळे, प्रियांका लामतुरे व शाळेतील सर्व पालक-बालक वर्ग उपस्थित होते, शाळेच्या वतीने ह.भ.प.स्वप्निल महाराज यांचे विशेष आभार मानण्यात आले.

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला”आई म्हणतात,पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात” आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही संघर्ष हा वडीलाकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे, बाकी सगळं दुनिया शिकवते, विश्वास बापावर ठेवा.आणि प्रेम आईवर करा ना कधी धोका भेटेल ना कधी मन तुटेल ज्याला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ना तो कधीच वाईट मार्गाला जात नाही आयुष्याच्या लढाईत “बाबा” नावाची तलवार आणि“आई” नावाची ‘ढाल सोबत असली की “संघर्षाला” सहज हरवता येते.
