संभाजीनगर [हवेलीनामा वृत्तसमुह] इयत्ता दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने मध्यरात्री आई वडिलाच्या परवानगीशिवाय सगळे कुटूंबीय झोपले असताना कार घेऊन बाहेर पडला कार चालविण्याची तो शिकलेला नव्हता त्यामुळेच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पदचारी पुलास धडकून प्राणास मुकला.

सोहम नीरज नवले (१७, रा. इस्सार पेट्रोल पंपाजवळ, गजानन मंदिर परिसर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोहम हा शहरातील वंडर गार्डन शाळेत दहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी त्याने पहिला पेपरही दिला. त्याला कार चालविता येत नव्हती; परंतु त्याला कार शिकायची होती. गुरुवारी रात्री तो वडील व बहीण आईसोबत कॅनॉट परिसरात आइस्क्रीम खाण्यासाठी गेला. ते रात्री ११ वाजता घरी परतले आणि झोपले. मात्र मध्यरात्रीनंतर सोहम गुपचूप पार्किंगमध्ये लावलेली कार (एमएच २० वाय ६८१९) घेऊन बाहेर पडला. काही वेळाने वडीलांना जाग आली दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी सोहमच्या रूममध्ये जाऊन बघितले तर तो खोलीत नव्हता.पार्किंगमधील कारही नव्हती. त्यावर त्यांनी मुलीकडे चौकशी केली. तिला काही माहिती नसल्याने दोघे सोहमच्या शोधात दुचाकीवर बाहेर पडले. परंतु सोहम भरधाव कार चालवीत असताना एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलास धडकून ठार झाला.

यावर सोहमच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याच विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

क्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली. तेव्हा मोठा आवाज झाला. यात कार अमधोमध चिरली. त्याचा काही भाग रस्ता ओलांडून पलीकडे फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच रात्र पाळीवर असलेले वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, जिन्सीच्या उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धावले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कार बाजूला केली. अधिक तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *