पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुरंदर आणि हवेली तालुक्यातील आफुच्या शेतीची चर्चा चालू असतानाच पुन्हा इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील माळेवाडी परिसरातील सहा शेतकऱ्यांनी मका पिकामध्ये व्यावसायिक हेतूने तब्बल 7087 किलो वजनाची 1 कोटी 41 लाख 74 हजार रुपये किमतीची अफूची लागवड केल्याचे प्रकरण पुढे आले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल शुक्रवार रोजी पळसदेव हद्दीतील माळेवाडी ता. इंदापुर जि. पुणे गावचे हद्दीत जमीन गट नंबर 51/2, गट नंबर 166/ब, गट नंबर 166/2/ब, गट नंबर 2, गट नंबर 4, गट नंबर 26/1 मध्ये काशीनाथ रामभाऊ बनसुडे,दत्तात्रय मारूती बनसुडे, राजाराम दगडु शेलार, लक्ष्मण सदाशिव बनसुडे, माधव मोतीराम बनसुडे, रामदास जगन्नाथ शिंदे (सर्व रा. माळेवाडी, पळसदेव ता. इंदापुर जि.पुणे) यांनी त्यांच्या शेतात अफु या अंमली पदार्थाच्या झाडांची थोड्या थोड्या अंतराने बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व्यवसायीक हेतुने एकूण 7,087 किलो वजनाची एकुण किंमत 1,41,74,000 /- रूपये ची लागवड केली असल्याचे आढळून आले.

त्यांच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अन्वये सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब, उत्पादन शुल्क निरीक्षक पोळ, तालुका कृषी अधिकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *