थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  विघ्नहर्त्या गणेशाचे आज मोठया थाटात आगमण झाले याही वर्षी कोरोनाचे सावट असले तरीही यावेळी भाविकांना थोडी मोकळीक दिली आहे भक्तांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळतो आहे.येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भक्तांनी चौकात गर्दी केली असली तरीही मंदिर दर्शन बंद असल्याने मुख्य दरवाज्याचेच दर्शन घेऊन परतावे लागले

            गणपती आगमण होण्याअगोदार भाद्रपद शुद्ध प्रतिपदा या दिवशीपासून येथे द्वारयात्रेला सुरुवात होते यात ग्रामस्थ सहभागी होतात परंतु कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असल्याने यावेळी मोजक्याच भाविकांनी यात सहभाग घेतला. दरवर्षी चिंतामणी मंदिरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात होते.रांगोळ्यांची आकर्षक सजावट करून शोभा वाढवली जात असे.
           चिंतामणीचे पुजारी आगलावे बंधू यांच्यावतीने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे सर्व देऊळवाडा उजळून निघाला. नेहमी भक्तांच्या दर्शनासाठी रांगा पहावयास मिळत होत्या परंतु यावेळी मात्र परिसरात पूर्ण शांतता पसरली होती.
        पहाटे अजय आगलावे यांनी पूजा केली तर चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी  महापुजा केली.रात्री आगलावे बंधू यांनी श्रीची पालखी सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *