पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) हिंदू परंपरेने भारतीय संस्कृतीत लग्न कार्याला अन्यय साधारण महत्त्व सध्या अनेक जण लग्न पारंपरिक पद्धतीनेच करतात. पाहुणे तसेच परिसरातील नागरिकांच्या लक्षात आपल्या लग्नाचा सोहळा रहावा असे काहीतरी वेगळा प्रयत्न करतात सध्या एका अशाच हटके विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे.पुण्यातील आंबेगाव येथे नवरीने आणि नवरदेवाने एकमेकांना सहा अटी घातल्या आणि मगच गळ्यात माळा घातल्या. या अटी ऐकूण सगळे वऱ्हाडी आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणजे या अटींचे त्यांनी पोस्टरही बनवले. याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
शासकीय, महसूल यासह विविध विभागात अनेक प्रकारे करारनामे केले जातात, मात्र लग्नात केलेला करारनामा ऐकले की नवल वाटणारच. कारण लग्न म्हटले की नवरदेव आणि नवरी यांचे एक नवे आयुष्य सुरू होते. नवदाम्पत्य नव्या आयुष्याच्या सुखी संसाराची स्वप्न पाहतात. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील मुलगा कृष्णा लंबे आणि जुन्नरच्या नारायणगावची मुलगी सायली ताजणे यांचा विवाह सोहळा मंचर मधील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात संपन्न झाला.दोघेही उच्चशिक्षित असून त्यांचा प्रेम विवाह झाला आहे. या करारनाम्यातून या नवरा, नवरिने एकमेकांच्या आई-वडिलांना सांभाळण्याचा, वाद झाल्यास तो तात्काळ मिटवण्याचा, एकमेकांच्या मित्रांना मानसन्मान देण्याचा एक सामाजिक संदेश दिला आहे. या करारनामामध्ये त्यांनी खालील प्रकारे करार केला आहे.
लग्नाचा करारनामा
1. कृष्णा – सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरच असेल.
2. सायली – मी कृष्णाकडे शॉपींग साठी हट्ट धरणार नाही.
3. सायली – मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीला जायला आडवणार नाही. (महिन्यातून दोन वेळा)
4. कृष्णा – मी सायलीची आणि आई-वडिलांची ही सेवा करेल
5. सायली – मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल.
6. आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू.
