पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह, गणेश धुमाळ) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून धडाकेबाजी कामगिरी करत जेष्ठ नागरीकाना लूटणारी टोळी जेरबंद केली. अज्ञात चोरट्यांनी मंचर हद्दीत थोरांदळे येथे राहणाऱ्या चिकणाबाई मिंडे, वय ७२ वर्ष यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पतीस मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन पसार झाले होते त्याबाबत मंचर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना दि. १६फेब्रुवारीला पारगाव पोलीस स्टेशन हद्दीत धामणी या गावात रात्री अकरा वाजता गोविंद फगवंत जाधव वय ८२ वर्ष यांच्या घरात अनोळखी माणसांनी घुसून त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले होते याबाबत पारगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. अशाप्रकारे एका मागून एक झालेल्या दोन गंभीर प्रकार घडल्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ सूचना देऊन गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. महादेव शेलार, पो.स. ई. गणेश जगदाळे, पो.हवा, दिपक साबळे, पो.हवा. राजू मोमीन, पो.ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू विरकर यांचे पथक तयार करुन तपास सुरू केला होता.
या गुन्हयाचा तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की, सदर गुन्हयामध्ये दरेवाडी ता. संगमनेर जि.अ.नगर येथील आकाश पांडुरंग फड नावाचा व्यक्ती असण्याची शक्यता आहे त्यानुसार मिळलेल्या बातमीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश फड याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणचे गुन्हे त्याचे इतर साथीदार १) वैभव दिगंबर नागरे, (वय २० वर्षे, रा. दरेवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर, अतिष बाळासाहेब बडवे, (वय २३ वर्षे, रा. पिंपरी लौकी ता. संगमनेर जि. अ.नगर, नंदकुमार पवार, (वय २१ वर्षे, रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर) व फरार आरोपीचे मदतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.पुढील तपास मंचर,पारगाव पोलिस करत आहेत.
