नांदेड [हवेलीनामा वृत्तसमुह] तिर्थक्षेत्राच्या विकासावर विशेष भर दिला जात असून,यापैकीच एक असलेल्या साडेतीन शक्तीपिठांपैकी असलेल्या माहुरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांसाठी स्वयंचलित पायऱ्या आणि स्कायवाॅक करण्याचा प्रकल्प मंजुर केला आहे त्यासाठी सात कोटी रुपये मंजुर करुन घेतले आहेत,याचे मार्च महिन्यात मी भुमिपुजन करण्यासाठी माहुरला जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी आज नांदेडमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

महाराष्ट्रातील विविध तिर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दळणवळणाचा विस्तार होणे आवश्यक आहे रस्ते विकासावर भर देणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातले असून संत परंपरा असलेल्या पालखी महामार्गाचे विस्तारीकरण व सुशोभिकरण केले जात आहे तर साडेतीन शक्तीपिठांना जोडणारे रस्ते देखील रुंदावत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी स्वयंचलित पायर्‍या तयार करण्यात येणार आहेत असे गडकरी यांनी नांदेड येथील कार्यक्रमात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *