पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] बारामती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रकल्पामध्ये जमीन गेल्याने सन 2006 पासून एक शेतकरी औद्योगिक विकास महामंडळाला प्रकल्पग्रस्त असल्याने उद्योगासाठी कायदेशीर जमीन मागणी करत होता मात्र याकडे महामंडळाने गेली अनेक वर्षापासून प्रतिसाद दिला नाही अखेरीस आंदोलनाचा इशारा केल्यानंतर 2017 साली महामंडळाने शंभर चौरस मीटर जागा दिली. मात्र दैवदुर्विलास अशीच परिस्थिती झाली महामंडळाने दिलेली जमीन पुन्हा पालखी मार्गात गेल्याने आणि साधारण लाखो रुपये खर्च करून केलेल्या पत्रा शेड तीन महिन्यात काढण्याची वेळ या शेतकऱ्यावर आल्याने अखेर या तरुणाने राष्ट्रपती यांच्याकडे इच्छा मरणाची विनंती केली आहे.

बारामती येथील शेतकरी नितीन नवनाथ चौधर यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारास कंटाळून अखेर इच्छा मरणाची राष्ट्रपतींकडे विनंती केली आहे.

आपल्या उदरनिर्वाहाचे स्वप्न भंगल्याने तसेच औद्योगिक विकास महामंडळ अथवा उपविभागीय अधिकारी आपली कसलीच दखल घेत नसल्याने यांनी हे पाऊल उचलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *