पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] जलसंपदा विभागातील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापक विभागातील करंज विहिरे येथील विभागीय अधिकाऱ्यावर कार्यवाही टाळण्यासाठी सात लाखाची लाच मागितल्या प्रकरणी व त्यापैकी साडेतीन लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या माहितीनुसार, जलसंपदा विभागातील भामा आसखेड उपविभाग करंज विहिरे येथील उपविभागीय अधिकारी तुळशीदास अश्रू आंधळे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांनी डेव्हलप केलेल्या प्लॉटिंग व्यवसायामधील सपाटीकरणांमध्ये पूररेषेच्या आत मध्ये सपाटीकरण काम केले असून यावर रितसर कारवाई करणार असल्याची बतावणी केली, जर ही कारवाई टाळायची असेल तर तुम्हाला सात लाख रुपये द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. यावर तक्रारदार यांनी याची रीतसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली यावर पडताळणी करून या विभागाने सापळा रचत तुळशीराम आंधळे यांना साडेतीन लाख रुपयाची लाच घेताना मोतीबाग बिल्डिंग आवारात शिवाजीनगर येथे ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *