पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] इंदापूर तालुक्यातील कुंभारगावच्या महिला सरपंच यांना अश्वील शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी उपसरपंचाच्या पतीवर भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.यात उदय अरुण भोईटे (रा. कुंभारगाव ता. इंदापूर जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरपंच उज्ज्वला परदेशी यांनी तक्रार दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की,ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भोई यांना उदय भोईटे यांनी पंचायतीच्या पायरीवर बसवले त्यावेळी महिला सरपंच तिथे पोहोचल्या त्यांनी बाहेर का बसला? असे विचारले. भोईटे यांनी बसवल्याचे त्यांनी सांगितले. यावर ग्रामसेवक सतीश बोरावके यांच्याकडे सरपंच विचारणा करत असताना त्यावेळी उदय भोईटे आले आणि त्यांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर उजवा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यावरून भिगवण पोलिसांनी भोईटे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस तपास करीत आहेत.
