पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्यातील दोन जिल्ह्याच्या नामांतरास केंद्राच्या मंजुरीनंतर आता औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद चे धाराशिव असे नामकरण करण्यात आले.या निर्णयानंतर सर्व राजकीय पक्षांकडून आनंद व्यक्त केला.छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री भुमरेंनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
परकीय आक्रमणकारांच्या पाऊल खुना पुसुन टाकण्यासाठी जी पावले उचलली जात आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नामकरणावर प्रतिक्रिया दिली.तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले.
