पुणे [हवेलीनामा स्पेशल पुजारी सर] समाजातील विविध अनिष्ट गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध विभाग कार्यरत आहेत परंतु त्यातील किती विभाग आपली जबाबदारी इमानदारीने पार पाडत आहेत याचा प्रत्येय अलिकडे अनुभवास येत आहे.यामध्ये पोलिस यंत्रणेवर सर्वच जबाबदार्या ढकलून देण्याची सवय लागली आहे खरतर गुन्हा घडल्यानंतर यातील सखोल तपास यांच्याकडे असतो परंतु सध्याचे चित्र वेगळेच अनुभवास येत आहे.
दारु,गांजा,आफु, चरस अशा मादक पदार्थावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे,अवैध वाळू उपसा गौण खनिज उत्खनन यावर महसूल विभागाकडून, गुटखा,बंदी घालण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थावर अन्न व औषध प्रशासन आणि वाहतूक संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु सगळीकडून यावर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा पोलिस खात्याकडून केली जाते.या विभागाचा बराचसा ताण यामुळेच वाढतोय त्यामुळे समाजातील इतर अडचणीकडे या विभागाला लक्ष केंद्रित करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही त्यामुळेच समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
