पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची आज जयंती परंतु बहुतेक ठिकाणी याचा अनेकांना विसर पडला की काय याची शंका येते एकेकाळी राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले याचे सध्या काय चित्र आहे,

महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार यांचा 23 फेब्रुवारी, 1876 मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अंजनगावात जन्म झाला आहे.. धोबी कुटुंबात जन्मलेले डेबूजी झिंगराजी जानोरकर पुढे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले.यांच्या जयंती निमित्त आज बुलडाणा बस स्टँड परिसरात लोकराजा शाहू फाऊंडेशन व ए.एस.पी.एम.आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान संस्था यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन व स्वच्छता अभियान राबविण्यात आले..किर्तनाच्या माध्यमातून गावा बरोबर बुध्दीची सुध्दा स्वच्छता करणारे महान संत कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी बसस्थानक परीसर स्वच्छ करुन गाडगे बाबाना अभिवादन करण्यात आले.यावेळी

लोकराजा शाहू फाऊंडेशन अध्यक्ष दादासाहेब काटकर,दामोदर बिडवे,डॉ.राजेश्वर उबरहंडे, कुणाल पैठणकर,राजेश टारपे, आत्माराम चौतमोल,पदमाकर डोंगर आणि विद्याथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *