पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) महाराष्ट्रात गेल्या काही काळात गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललेला आहे प्रत्येक शहारात रोज कोणता न कोणता भयंकर गुन्हा घडतच आहे. अशाच एका गुन्हेगारी कृत्याने सोलापूर जिल्हा हादरला असून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात धक्कादायक प्रकार घडला आहे यात तीन महिलांची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

काल मंगळवारी अज्ञात माथेफिरूने दगड आणि धारदार शस्त्राने ही हत्या केली. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दीपाली माळी, पारुबाई माळी, संगीता माळी असे हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. महादेव माळी यांचा हॉटेल व्यवसाय आहे.त्यांच्या आईचे निधन झाल्यावर, आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी महादेव माळी यांच्याकडे बहिणी नंदेश्वर येथे आल्या होत्या. दरम्यान, दगडाने काठीने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. दीपाली बाळू माळी (वय 25) ही महादेव माळी यांची सून आहे. तर पारूबाई बाबाजी माळी (वय 45) आणि संगीता महादेव माळी (वय 50) या त्यांच्या दोन बहिणी होत्या.या तिघांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारील समाधान लोहार या व्यक्तीने या तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पोलिसांनी समाधान लोहार या संशयितास ताब्यात घेतले. हत्येचे कारण समोर आलेले नाही. अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव घटनास्थळी दाखल झालेले असून याप्रकरणी मगंळवेढा पोलीस पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *