पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] थेऊर येथे माजी आमदार संभाजी कुंजीर यांची शेती असून त्यांना आपल्या शेतात ऊसाची लागवड केली आहे ऊस तोडणीयोग्य झाल्याने शेतात ऊसाची पाहणी करताना शेतातील ऊस कोणीतरी चोरल्याचे लक्षात आहे आणि त्यांनी थेऊर पोलीस चौकीत याबाबत रितसर तक्रार दाखल केली.

थेऊर हे बारमाही हरितपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे परंतु अलिकडच्या काळात शहरीकरणाची वारे याही भागात वाहू लागल्याने गुंठ्ठेवारीचे फलक झळकू लागले आहेत तरीही अनेक छोट्या मोठ्या शेतकऱ्यांकडून आपली शेतजमीन कसण्यात येत आहे.यापैकीच असलेले माजी आमदार संभाजी कुंजीर होत.त्यांनी आपल्या शेतातील जवळपास 4.5 टन ऊस चोरीला गेल्याचे पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.यावर परिसरात हा एकच चर्चेचा विषय झाला आहे.

थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख त्यांचे सहकारी पोलीस हवालदार विजय जाधव, दिगंबर जगताप आणि विशाल बनकर यांनी शेतावर भेट देऊन शेताची पाहणी केली आहे आणि अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार विजय जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *