पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सीबीएससी बोर्डाच्या बोगस एनओसी शाळांची संख्या सात वर गेली असून पुरावे देऊन गुन्हा दाखल होऊन देखील कारवाई होत नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र यावर चर्चा होत आहे,गुन्हा मात्र अज्ञाताविरोधात दाखल करण्यात आल्याने यातही कुठेतरी पाणी मुरतय का यास शंकेला जागा आहे.
सीबीएससी बोर्डाच्या शाळा काढण्यासाठी मान्यता देताना त्यासाठी बनावट ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी वापरण्यात आल्याची घटना जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांसाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून एनओसी देण्यासाठीचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले प्रत्यक्षात यातील काही ना हरकत प्रमाणपत्रे बनावट असल्याची बाब शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत निदर्शनास आले, सुरुवातीला तीन एनओसी बनावट असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर यात आणखी भर पडली असून आत्तापर्यंत सात शाळांची एन ओ सी प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आले बनावट एनओसी प्रमाणपत्रे असल्याची चौकशी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली, परंतु प्रत्यक्षात गुन्हा मात्र माध्यमिक शिक्षण विभागाकडून दाखल करण्यात आला तो देखील अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला म्हणजे यातही मोठा घोळ दिसून येतो हा गुन्हा आज्ञात व्यक्तीच्या विरोधात का दाखल केला चौकशीतून निष्पन्न झालेल्या वस्तुस्थितीवर गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना हा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल करण्यात आला विशेष म्हणजे या गुन्ह्या संदर्भात शिक्षण विभागाकडूनही आत्तापर्यंत पाठपुरावा करण्यात आलेला नसल्याचेही यातून निष्पन्न होत आहे.
एकंदरीतच कोणालाही याबद्दल गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे परंतु अशा बोगस शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
