पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] बी डी एस प्रणाली बंद असल्याने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतील रक्कम मिळत नसल्याने कर्मचारी अर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शासनाच्या विविध विभागाअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांकडून आपल्या भविष्यातील संभाव्य अडचणींचा विचार करून भविष्य निर्वाह निधी जमा केला जातो याचा उपयोग आपल्या मुलांच्या शिक्षणासह मुलामुलींच्या विवाह सोहोळ्यात उपयोगी पडावे हा हेतू असतो परंतु हा भविष्य निर्वाह निधी मिळण्यात कोरोना काळापासून मोठ्या अडचणी येत असून यामुळे अनेक कामगारांना आपला हक्काचा पैसा वेळेवर मिळत नाही कारण ही संपूर्ण प्रणाली ज्यावर चालते ती बी डी एस यंत्रणाच गेल्या अनेक महिन्यांपासून काम करत नाही.
याचा परिणाम या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गणितावर होताना दिसत आहे यावर लवकरच काहीतरी उपाययोजना शासनाकडून होणे आवश्यक असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
