पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे -अहमदनगर महामार्गावर कारेगाव नजीक फलके मळ्यानजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन वर्षाच्या लहान मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नगर महामार्गावर कारेगाव जवळ फलकेमळा येथे कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूने इंडिका कारने जोरात धडक दिली.

 

या अपघाताची भयानकता इतकी होती की, यामध्ये एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील सर्व कुटुंब हे बीड जिल्ह्यातील आहे, ज्यामघ्ये एका दोन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.एकाच कुटूंबातील चौघांना अपघातात जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. असून मदतकार्यास सुरूवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *