पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नद्या प्रदूषित होत आहेत तर दुसऱ्या बाजूला भूजलाचा बेसुमार उपसा होत आहे यामुळे भविष्यात निर्माण होणारी गंभीर परिस्थिती रोखण्यासाठी सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची चळवळ हाती घेतली पाहिजे असं मत केंद्रीय गृह बांधणी आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी काल पुण्यात व्यक्त केलं शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाचा धोरण ठरवणाऱ्या रिव्हरसिटी अलायन्स धारा 2023 या आंतरराष्ट्रीय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते दोन दिवस चाललेल्या या बैठकीत देशभरातील सुमारे 300 प्रतिनिधींनी भाग घेतला यामध्ये महानगरपालिकांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंते, वरिष्ठ नियोजनकार आणि देश विदेशातील अभ्यासक, जलसुरक्षा तज्ञ तसेच आर्थिक तज्ञ सहभागी झाले होते या अंतराष्ट्रीय बैठकीत पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यातील नद्यांच्या सुशोभीकरणाविषयी सादरीकरण केलं पुण्यातील नद्यांच्या पुनर्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यात नद्यांची स्वच्छता केली जाणार असून प्रक्रिया केल्याशिवाय कोणताही सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही याची निश्चिती आणि सौंदर्यीकरण केलं जाईल यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार केली जातील त्याचबरोबर नदीकिनारी घाट आणि बंधारे बांधून नदी बारमाही वाहती असेल असं उद्दिष्ट समोर ठेवण्यात येईल असे विक्रमकुमार यांनी यावेळी सांगितलं, गेली कित्येक दशक आपण आपल्या जगण्यासाठी या नद्यांचा वापर केल्यानंतर आता आपण या नद्यांना काय देऊ शकतो यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे अन्यथा आपल्या भावी पिढीला पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावा लागेल आपल्या जलविषयक उपक्रमांची व्याप्ती केवळ पायाभूत सुविधांच्या विकासापूर्ती मर्यादित न ठेवता लोकांना नद्यांशी जोडण्याचा प्रयत्न जोमानं करायला हवा आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाचा भाग म्हणून आणि आता एक एक पिढ्या नंतर कमी होत गेलेला पाण्याबद्दलचा आदर पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे नमामी गंगे कार्यक्रम जगभरात नावाचा गेला आहे पुण्याची गोष्ट करायची तर नमामि मुळा नमामि मुठा असा मंत्र रोजच जपावा लागेल म्हणजे आपल्या गावातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये यथेच्छ ढुंबता येईल तिचं ओंजळभर पाणी निर्धोकपणे पिता येईल
