पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्याकडून शहरासह उपनगर व ग्रामीण भागात बस सेवा पुरवली जाते,गेल्या काही दिवसात यातील काही नवीन मार्ग तर काही मार्गाचा विस्तार करण्यात आला यात श्रीक्षेत्र थेऊर येथील बसचा विस्तार करुन वाघोलीपर्यंत पुढे वाढवण्यात आली त्यामुळे दोन बसमधील अंतर तब्बल 50 मिनिटाचे झाले यामुळे शालेय विद्यार्थी आणि कामगार याना अडचण निर्माण झाली आहे.

थेऊर वाघोली दरम्यान यापूर्वी वाहतूक सेवा नसल्याने अनेकांच्या अडचणी होत होत्या ही सेवा चालू केल्यामुळे थेऊर वाघोली दरम्यानच्या गावांना याचा नक्कीच फायदा होत आहे परंतु पी एम पी एम एल यांच्याकडून थेऊर साठी पूर्वी असलेल्या तीनच बस उपलब्ध करून त्यापुढे वाढवण्यात आल्या परिणामी दोन गाड्यातील अंतर खूपच वाढले याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांबरोबरच कामगार तसेच बसने प्रवास करणारे प्रवासी, भाविक यांना मोठ्या प्रमाणावर झाला. विशेषतः काही बसमधील अंतर तर तब्बल दीड तास असे आहे त्यामुळे प्रशासनाने यावर काहीतरी निर्णय करून विद्यार्थी तसेच कामगार यांना ही सेवा कमीत कमी 20 ते 25 मिनिटांच्या अंतराने मिळावी अशी मागणी होत आहे.

थेऊर मधून सकाळी पहिली बस साडेसहाच्या दरम्यान मिळते पूर्वी ही बस सहा वाजून दहा मिनिटांनी असे त्यामुळे हडपसर, उरुळी कांचन या भागात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ती बस सोयीची होती, त्यानंतर दुसरी बस 50 मिनिटांनी म्हणजेच साधारण सात वाजून वीस मिनिटांनी ही बस उपलब्ध होते त्यामुळे या दोन बसमधील अंतर मोठे असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होते यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला खतपाणी मिळत असल्याचेही दिसून येते.

यावर आणखी बसची संख्या वाढवण्यात यावी अथवा शाळेच्या वेळात थेऊरपर्यंत एखादी बस सोडावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *