पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शहरातील वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले त्यानुसार लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आपल्या सहकार्यांना यासंदर्भात सूचना दिल्या.
तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन गायकवाड पोलीस नाईक सुनील नागलोत पोलीस शिपाई राजेश दराडे हे आपल्या हद्दीत गस्त घालत असताना पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती परिसरात एक तरुण विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून सुसाट वेगाने जात असताना दिसला तेव्हा त्याचा पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले व दुचाकी संदर्भात चौकशी केली सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु नंतर त्याने आपले नाव खंडू नामदेव बेडगे वय ३६ रा.बोरी सलगरा ता.जि लातूर असून त्याने वाहन लोणी स्टेशन परिसरातून चोरल्याचे मान्य केले.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना याची कल्पना दिली त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने वडकी चंदननगर व लोणी काळभोर येथून तीन दुचाकी चोरल्याचे सांगितले.त्याच्याकडून रु ८५००० किमतीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत,अमित साळुंखे,श्रीनाथ जाधव,पोलीस शिपाई राजेश दराडे,निखिल पवार,बाजीराव विर,शैलेश कुदळे या पथकाने केली.
