राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन) खेड तालुक्याच्या प्रश्चिम भागातील एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीवर सहा जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यापैकी तीन आरोपीना खेड पोलिसांनी अटक केली असून तीन आरोपी फरारी आहेत.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या घुमटकर, आकाश सुनिल शिंदे ,परेश माणिक ढमाले, अवधुत संतोष कनसे, साईनाथ मुळुक ,सुरज सुनिल रोडे (सर्व .रा चास, ता. खेड ) यांना पिडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असुनही सोन्या घुमटकर याने धमकी देवुन जबरदस्तीने पिडित मुलीबरोबर मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. व त्याच्यासह इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पिडित मुलीला धमकावुन जबरदस्तीकरून लैंगिक अत्याचार केला. पिडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत खेड पोलिसांनी सोन्या घुमटकर (वय २९ ), आकाश शिंदे ( वय२१ ), सुरज रोडे (वय२४ ) यांना अटक केली आहे. तर परेश ढमाले, अवधुत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षाराणी घाटे करत आहे.
