पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] श्रीक्षेत्र तुळापूर येथील धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या विकास आराखड्यासाठी 384 कोटी एवढ्या रकमेचा निधी निश्चित झाला असून 15 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर याचे अंतिम सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
धर्मवीर संभाजी राजे समाधी स्थळाचा विकासा आराखडा तात्कालीन सरकारने यापूर्वीच तयार केला होता त्यावेळी आराखड्यासाठी 269 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ तथा शंभू भक्तांच्या सूचना देखील मागविण्यात आल्या होत्या साधारण सुधारणा करण्यात आलेल्या विकासाराखड्यासाठी पूर्वीच्या रकमेमध्ये 115 कोटीची वाढ करण्यात आली आहे आपटी – तुळापूर दरम्यानच्या पुलासाठी 27 कोटी तर आपटी – वढू बुद्रुक रस्त्यासाठी 60 कोटी प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे या भागातून वाहतुकीची कोंडी होणार नाही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अनिल ढेरे, प्रकल्प सल्लागार जिल्हा नियोजन समितीचे भगवान पोखरकर, देविदास दरेकर पुणे अभियंता कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
