पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन करण्यात आल्यानंतर कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल मध्ये बॉम्ब असल्याचा फोन करण्यात आला होता.
काल कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक फोन कॉल, मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ असा धामिकाचा निनावी कॉल करण्यात आला होता. बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली होती.परंतु तपासामध्ये यावेळी कुठली ही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. धमकीचा फोन कॉल केल्याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीला हैद्राबाद मधून ताब्यात घेतले. हा व्यक्ती दारूच्या नशेत त्याने हा कॉल केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे आणि त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच गोष्टीचा राग मनात धरून या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून दारूच्या नशेत थेट गुगल चे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती
