पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] उत्तर पश्चिम सिरीयातील भूकंपात नष्ट झालेल्या इमारतीच्या ढिगार्‍या खालून तब्बल 128 तासानंतर एका नवजात मुलीला वाचविण्यात यश आले आहे प्रसूतीनंतर तिच्या आईचा मृत्यू झाला होता असे एका नातेवाईकांनी सांगितले भूकंपात तिचे वडील, चार भावंडे आणि काकू ठार झाली होती.

जिदायरिस शहरातील इमारतीच्या ढिगार्‍या खालून बालिकेला बाहेर काढल्यानंतर ती धुळीने माखली होती आफरीन येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की तिची प्रकृती आता स्थिर आहे. जिदायरिस शहरात 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने नष्ट झालेल्या सुमारे 50 पैकी ती एक इमारत होती ुमारे 128 तासानंतर बाली केला ढिगार्‍या खालून बाहेर काढण्यात आले होते, नागरिकांनी खोदकाम करत असताना तिचा आवाज ऐकला त्यांनी मंगळवारी एपी वृत्तसंस्थेला सांगितले आम्ही धुळ साफ केली तेव्हा नाळेसह बालिका आढळली ती कापली आणि तिला रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *