थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) भाद्रपद शुद्ध तृतीया आजचे तिसरे द्वार थेऊरच्या उत्तरेस असलेल्या मांजरी येथील श्री मांंजराई देवी मंदिर होय.सलग तीन दिवस पायी चालण्यामुळे भाविकांमध्ये अधिक उत्साह जाणवत होता.

       कोरोना महामारीमुळे द्वारयात्रेला मर्यादा आल्याने यावेळी मोजक्याच ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. सकाळी श्रींचे दर्शन घेऊन भाविक यात्रेस मार्गस्थ झाले.अंतर फार नसल्याने चालण्याचा वेग चांगला होता.मार्गात कोलवडी मांजरी खुर्द या गावातून यात्रेकरू चालत मुळामुठा नदीकिनारी पोहोचले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्व भक्त मांजराई देवी मंदिरात पोहोचली.

        येथे पोहोचल्यावर देवस्थानचे पुजारी जगन्नाथ विठ्ठल भैरवकर यांनी द्वारयात्रेचे स्वागत केले.मंदिरात महापुजा तसेच देवीची ओटी भरण्यात आली.महाआरती घेतल्यानंतर महाप्रसाद घेतला. त्यानंतर यात्रेकरू थेऊर कडे मार्गस्थ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *