पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे,27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालेल, तर 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, पण या अधिवेशनाच्या अगोदरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय सर्जिकल स्ट्राईक होणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. येत्या 15 दिवसांमध्ये 10-15 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.म्हणून ‘सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे.असेही ते म्हणाले.भविष्यात 20 – 25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुत राहील आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल’, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ‘इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याचं कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे.
त्यांच्या माहितीनुसार 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदारच राहिले नाहीत, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल’, असं बच्चू कडू म्हणाले.येत्या 14 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार असून सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत निकाल विरोधात गेला तर राज्य सरकारचा हा प्लान बी तर बच्चू कडूंनी बोलून दाखवत नसतील ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
