पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] समाजात दशहत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करण्याच्या सूचना पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले. यावर पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५, चे विक्रांत देशमुख यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात चालू असलेल्या अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील अधिकाऱ्यांना केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताञय चव्हाण यांनी अवैध धदयांबाबत माहिती घेतली असता असे समजले की, ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही अशा ठिकाणी जंगलामध्ये निर्जनस्थळी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम सर्रास चालू असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार, तसेच परिमंडळ ४ व ५ कडील आ सी पी पथक व उत्पादन शुल्क विभागाकडील अधिकारी व स्टाफ यांचे सोबत विचारविनिमय करून नियोजनबद्ध दोन पथके तयार केली.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात सोरतापवाडी, शिंदवणे, लोणीकाळभोर मांडाळमळा येथील अवैध गावठी हातभट्टी दारु भट्टीवर धडक कारवाई करुन काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे येथील गावठी हातभट्टीवर कारवाई केली तेथे जमिनित खड्डे करून अंदाजे चार हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे चार पत्र्याचे भांडे असे अंदाज ४४०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट केला.

त्याचवेळी दुस-या पथकाने मांडाळमळा, रूपनरवस्ती, लोणी काळभोर या ठिकाणी छापा टाकून तेथे दोन पञ्याचे टाक्यामध्ये तसेच जमिनीत खड्डा करून काळे रंगाची ताडपत्री अंथरून त्यामध्ये साठवलेले अंदाजे ३००० लिटर गुळ, तुरटी व पाणी मिश्रित असलेले कच्चे रसायन, हातभट्टीसमोर पडलेली जळावू लाकडे, पञ्याच्या टाक्या इत्यादी साहित्य पोलीसांनी जागेवरच नष्ट केले आहे. या कारवाईत अंदाजे एकुण ८८,०००/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा व दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट करण्यात आले आहे.
याप्रकरणी १) राहुल व्यंकट राठोड, वय २७ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे २) पंकाबाई व्यंकट राठोड, वय ५२ वर्षे, धंदा घरकाम, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे ३) जयश्री कांतीलाल राठोड, वय ३५ वर्षे, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे, ४) सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ, वय-२६ वर्षे, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता.हवेली, जि. पुणे. यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस करत आहेत.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-५, बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, वैभव मोरे, पोलीस हवालदार गायकवाड, बोरावके, पोलीस नाईक नागलोत, साळुंखे, जाधव,राठोड, पोलीस शिपाई पवार, कुदळे, शिरगीरे, विर, फणसे, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, आरसीपी ४ व आरसीपी ५ तसेच राज्य उत्पादन शुल्क जी विभाग पुणे यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.
