पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारुप मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे

निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 245 बाजार समिती यांच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्या होत्या त्यापूर्वी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी एक सप्टेंबर 2022 ही अहर्ता निश्चित केली मात्र शासनाच्या 7 फेब्रुवारी 2023 रोजीच्या अधिसूचनानुसार नव्याने निवडून आलेल्या प्राथमिक सहकारी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत यांच्या सदस्यांना अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट करणे आवश्यक असल्याने पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये या नवीन सदस्यांना समाविष्ट करून नवीन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली

सुधारित मतदार यादी कार्यक्रमानुसार 10 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ट करून प्रतिनिधित्व संपुष्टात आलेल्या सदस्यांची नावे वगळून अंतिम मतदार यादीत सुधारणा करण्यात येणार आहे अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रारूप मतदार यादी 27 फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे यादीमध्ये 27 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत अक्षय वा हरकती नोंदवता येतील प्राप्त झालेल्या हरकतीवर 17 मार्च पर्यंत निर्णय घेऊ 20 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल

अंतिम मतदार यादी मध्ये नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश नसल्यास त्यांना बाजार समितीच्या निवडणुका करेल का उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल असेही प्राधिकरणाने सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *