मुंबई [ हवेलीनामा वृत्तसमुह] राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाण्यासाठी अनेक कारणे असली तरीही तत्कालीन विधानसभा अध्यक्ष असलेले नाना पटोले यांनी राजीनामा दिला हे त्यातील एक प्रमुख कारण ठरले पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता तेथूनच खरी संकटाची मालिका सुरू झाली ते अध्यक्षपदी असते तर पुढचे अनेक पेच निर्माण झालेच नसते, त्यांचा निर्णय अपरिपक्व ठरला त्यामुळे महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार संकटात आले, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात केली आहे
काँग्रेसमधील अंतर्गत वाद थोरात आणि नाना पटोले हा सामंजस्यपणे सोडवला तर त्याचा उपयोग होऊ शकतो अन्यथा भाजपला ही एक आयती संधी मिळत जाईल, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमधून काँग्रेसला नाव संजीवनी देण्याचा प्रयत्न केला त्याला विपरीत काम राज्यात होऊ नये हा वाद न वाढता पक्ष पुढे कसा नेला जाईल यासाठी प्रयत्न व्हावेत, थोरात हे काँग्रेस पक्षाचे जुने जाणते व महत्त्वाचे नेते आहेत ते महाराष्ट्र काँग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा असून अनेक वाद विवादात थोरात यांनी काँग्रेसला धरून ठेवले विशेषतः तांबे प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असूनही अपमानित केले असा त्यांचा आरोप आहे यावरही विचार मंथन होण्याची गरज आहे थोरात यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्यांचा सन्मान करायचा नाही तर कुणाचा करायचा, महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरात यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष असलेल्या पटोले यांनी दिलेल्या तडकापैकी राजीनामा हे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे.
