पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) शाळकरी रिक्षाला ट्रकने ठोकरल्याने या अपघातात सात शालेय विद्यार्थींचा मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कांकेर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील कोरेरजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात सात शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.रिक्षाचालक शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन जात होता त्यावेळी एका भरधाव ट्रकने रिक्षाला जोरदार ठोसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर झाला. 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर कोरेर रुग्णालयात 5 मुलांचा मृत्यू झाला.रक्षामध्ये चालक आणि आठ मुलांसह 9 जण होते. सर्व मुले 5 ते 8 वयोगटातील आहेत. चालक आणि एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करुन कांकेर येथील कोरेर चिल्हाटी चौकात रिक्षा आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ही बातमी अत्यंत दु:खद आहे. आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. देव कुटुंबीयांना धीर देवो. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
