पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) इंदापुर पोलीसांनी धडाकेबाजी कारवाई करत तब्बल २४०किलो गांजासह ७० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने सरडेवाडी टोल नाका येथे विषाखपट्टनम येथून पुण्याकडे जाणा-या वाहनामध्ये व्यवासायाकरीता वाहतुक करणारा गांजा सह दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार,इंदापुर पोलीस स्टेशन येथे नुकतेच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापुर-पुणे महामार्गावर सोलापुरकडुन पुण्याकडे जाताना सरडेवाडी टोलनाका येथे एक हुंदाई कंपनीची क्रेटा कार नं. MH-42 AR-5656 मध्ये काही लोक अंमली पदार्थ (गांजा) ची वाहतुक करणार आहेत,अशी माहिती मिळाल्याने इंदापुर पोलिसांचे पथक सरडेवाडी टोलनाक्यावर सापळा लावून बसले ती गाडी दिसताच तिला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाने गाडी टोलनाक्यावरील दुभाजकावर चढविल्याने ते जागीच थांबली, गाडीची तपासणी करताना डिक्कीमध्ये व मधल्या सिटचे खाली खाकी रंगाचे चिकटपटटीचे आवरण असलेले १२० पॅकेट्स दिसुन आले पॅकेट्स उघडुन पाहीले असता यामध्ये कॅनाबियस वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा असे एकुण २४० किलो ओलसर गांजा किमंत साठ लाख रुपये तसेच गाडीची किंमत दहा लाख असा एकूण ७०,२०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला.यात १) रूपेश दिलीप जाधव रा. वृंदावन पार्क, कसबा, ता. बारामती जि. पुणे २) सुनिल तुळशीदास वेदपाठक रा. वाघज रोड, देवळे पार्क बारामती ता. बारामती जि.पुणे दोन जणांना अटक करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस नाईक सलमान खान, पोलिस हवालदार वालगुडे, लक्ष्मण सुर्यवंशी,दिनेश चोरमले,शिवाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोळे, विकास राखुंडे, विक्रम जमादार या पथकाने केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *