नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती 750 डॉलर प्रतिमेत्रिक तणावरून कमी झाले आहेत त्यामुळे देशांतर्गत घरगुती सिलेंडरच्या किमती कमी होतील आणि ग्राहकांना किफायतशीर दरात घरगुती सिलेंडर देता येईल अशी माहिती लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिन्ह पुरी यांनी गुरुवारी दिली

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत इंधनाची किंमत विविध घटकाद्वारे निर्धारित केली जाते आंतरराष्ट्रीय स्तरावर किमतीचा भडका उडाल्याने देशांतर्गत एलपीजी ची किंमत वाढू दिली नाही असेही ते म्हणाले येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गॅस उपलब्ध होईल.

सर्वसामान्य नागरिक महागाईच्या कचाट्यात सापडला आहे आणि गेली कित्येक महिन्यांपासून गॅसच्या किमतीचा आलेख खाली येत नाही तर अधिकच वाढत चालला आहे अशावेळी ही एक आशादायी माहिती लोकसभेतून मिळाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *