पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] बहुचर्चित पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैभव यांनी मान्यता दिली केंद्र शासनाच्या अंतिम मजुरीसाठी हा प्रकल्प थांबला होता मंजुरी मिळाल्याने लवकरच हा रेल्वे प्रकल्प जलद गतीने पार पडेल या प्रकल्पामुळे दोन्ही शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.

शिरूर चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळात या रेल्वे मार्गाला गती मिळावी यासाठी प्रयत्न केले त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट रेल्वे मंत्रालयाने हाय स्पीड प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशाचाही फायदा होणार आहे

सध्या पुणे नाशिक दरम्यान कोणताही रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक येथे जाण्यासाठी रेल्वे मुंबईवरूनच जावे लागते त्यासाठी प्रवाशांना सहा तास किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वेची संकल्पना अमलात आणली आहे हा मार्ग पुणे नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमालांची वाहतूक करण्यासाठी मोठी चांगली सुविधा या प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे या प्रकल्पासाठी रेल्वेने आवश्यक 1450 हेक्टर पैकी 30 हेक्टर पेक्षा अधिक खाजगी जागा संपादित केली आहे.

हा रेल्वे प्रकल्प राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने 16000 कोटीचा असून 235 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग असेल पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यांना हा मार्ग जोडणार आहे 200 किलोमीटर प्रति तास वेगाने या मार्गावर रेल्वे धावू शकते या रेल्वे मार्गावर एकूण 24 स्थानके 18 बोगदे 41 उडान पूल व 128 भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह दुहेरी मार्गाचे काम केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *