पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] जिल्हाधिकारी पुणे यांची परवानगी न घेता अर्जदाराच्या नावावर असलेली नवीन शर्तीची जमीन परस्पर प्रस्थाच्या नावावर वर्ग करण्याचा प्रताप बारामतीचे महसूल अधिकारी यांच्या चांगलंच अंगलट आल्याचे समोर आले असून पुणे जिल्हा अधिकारी यांनी बारामतीचे महसूल अधिकारी व कर्मचारी यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून रक्कम वसुलीचे तसेच शासनाचे क्षेत्र जप्त करण्याचे आदेश दिले आहेत

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे व शिवाजी कोकणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती
बारामती तालुक्यातील मौजे कोर्हाळे येथील गट नंबर 94/2 ही 16 एकर जमीन भगवान धर्म आढागळे यांना उदरनिर्वाहासाठी शासनाच्या अटी व शर्तीच्या आधी राहून दि 4 जून 1979 रोजी फॉरेस्ट वर्ग दोन ची नवीन शर्तीने देण्यात आलेली जमीन भगवान अडागळे यांनी 25 मार्च 2019 रोजी बिगर ताबा साठी खत तदनंतर मृत्युपत्र केले यामध्ये शासनाची परवानगी घेऊन मृत्युपत्र प्रमाणे वारस दाखल करण्याची विनंती केली होती मात्र मृत्युपत्रात बायको किंवा मुलाचा उल्लेख न करता त्रयस्थ व्यक्तीला जमीन साठे खताप्रमाणे विक्री केल्याचे ना होते दरम्यान 28 ऑगस्ट 2019 रोजी भगवान आढागळे हे मृत पावले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी या नियमाप्रमाणे वारस होत्या मात्र त्यांची वारस म्हणून नोंद न घेता मृत्युपत्र प्रमाणे नोंदी केल्यामुळे शासनाच्या तीन कोटी 44 लाख 32 हजार महसूल बुडविला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी बारामतीचे प्रांत अधिकारी तहसीलदार सर्कल व तलाठी यांच्यावर केला तर भगवान आढागळे यांच्या मृत्यूनंतर बिगर ताबा साठी खत करून घेणार याचे नवीन नवीन शर्तीच्या जमिनीच्या मंडळ अधिकारी तलाठी आणि त्यांना पाठीशी घालणारे प्रांत अधिकारी यांना सेवन ऑब्लिक 12 उताऱ्यावर लावली ज्याची प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेणे गरजेचे होते तसे न केल्याने 16 एकर जमिनीचा सरकारी महसूल बुडाला असल्याचे त्यांनी या तक्रारीत नमूद केले होते
