पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकले तरच आपल्या मुलांची प्रगती होते असा गोड गैरसमज आज अनेक पालकांमध्ये निर्माण झाला आहे परंतु आपल्या पाल्याच्या प्रगतीशी आपण कोणत्या भाषेमध्ये शिकतो याचा काहीही संबंध नसतो मराठी भाषेमध्ये शिकून देखील जागतिक स्तरावरील यश मिळवता येते मातृ भाषेतील शिक्षण हे खऱ्या अर्थाने नैसर्गिक प्रशिक्षण होय मुलांच्या पंखांमध्ये बळ देणार हे शिक्षण असतं त्यामुळे आपल्या मुलाची मराठी भाषेशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका डॉ नीलिमा गुंडी यांनी केले.

शिक्षण प्रसारक मंडळी मुलींची शिशु शाळा यांच्यातर्फे शाळेच्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सन्मान लोकमान्य नगर येथील शाळेत पार पडला शिक्षण प्रसारक मंडळीचे ॲड मिहीर प्रभू देसाई, श्रीरंग कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री येडगावकर आदी यावेळी उपस्थित होते नेहा जोशी, मृण्मयी जोशी, सानिका खळतकर या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सन्मान यावेळी करण्यात आला नृत्य, नाट्य आणि संगीत विषय विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यावेळी पार पडले

डॉ नीलिमा गुंडी पुढे म्हणाल्या की, आपल्या देशाला नोबेल पारितोषिक मिळत नाही अशी आपण खंत व्यक्त करतो परंतु आपण आपल्या भाषेपासून जर दूर जात राहिलो तर आपल्याला नोबेल कसे मिळणार? लहान मुलांना मराठी भाषेची असणारी गोडी आपण कायम ठेवली पाहिजे त्यांच्या भाषेमध्ये होणाऱ्या चुका या मोजपट्टीमध्ये न मांडता मुलांना आपल्या मातृभाषेचा आनंद आणि अभिमान वाटायला पाहिजे अशा प्रकारेच मात्र भाषेतून शिक्षण दिलं पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *