पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे सोलापूर महामार्गावरील मोठ्या लोकवस्तीचे गाव असलेल्या उरुळीकांचन येथील पोस्ट ऑफिस सर्वसामान्य नागरिकांना लवकर मिळणे अवघड झाले असून एक छोटासा फलक समोरील बाजूस दिसून येत आहे.

शासकीय कामाची कागदपत्र भारतीय टपाल खात्याकडून पाठवले जातात यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पोस्टाची आवशकता भासते.विशेषतः या गावात अनेक शासकीय कार्यालये असल्याने सर्व पत्र व्यवहार करण्यासाठी याची आवश्यकता असते त्यामुळे पोस्ट शोधत असताना पुणे सोलापूर महामार्गावर मुख्य चौकाच्या बाजुलाच हे कार्यालय थाटले आहे परंतू कार्यालयालयाचा दर्शक फलक मात्र सहज नजरेस पडत नाही त्यामुळे अडचण होत असल्याचे नागरिक सांगतात.

यावर संबंधित पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की गावामध्ये कार्यालयासाठी सोयीची जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे नाईलाजास्तव अशी जागा निवडावी लागली खरे तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना सहज कार्यालयात प्रवेश मिळावा अशी सोय असणे आवश्यक आहे तशी ग्रामपंचायत यांच्या वतीने गावातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे परंतु येथे तशी जागा आरक्षित केलेली दिसत नाही कार्यालयात येताना ज्येष्ठ नागरिकना अनेक वेळा त्रास होतो अशा वेळी आम्हाला कार्यालयातून खाली तळमजल्यावर येऊन त्यांना सेवा द्यावी लागते.

यावर उरुळीकांचन चे ग्रामविकास अधिकारी हनुमंत डोळस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की,ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नाही त्यामुळे पोस्ट ऑफिस साठी जागा देता येत नाही जर कुठल्या दात्याने बक्षीसपत्र करुन दिले तरच त्याची उपलब्धता होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *