पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) दुचाकीला रिक्षाचा धक्का लागला म्हणून एका रिक्षा चालकाचा पुण्यात खून झाला या घटनेने एकच खळबळ उडाली ही घटना सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात घडली. दुचाकीला रिक्षाचा धक्का लागल्यानंतर दोघांकडून बाचाबाची झाली यातून रिक्षाचालकाला दुचाकीवरील तरुणानी बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना घडली दुचाकीस्वारासह त्याच्या साथीदारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे .   पुणे शहर पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. यात दुचाकीस्वार मुकील गफूर शेख (रा. कोंढवा), अरबाज मेहबूब शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.

 

रिक्षाचालक किरण याचा भाऊ मधुकर याने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किरण, त्याचा भाऊ मधुकर, बंटी कसबे आणि मित्र भापकर चौकातील पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार मुकील याला रिक्षाचा धक्का लागला. या कारणावरून रिक्षाचालक किरण आणि दुचाकीस्वार मुकील यांच्यात वाद झाला. मुकील व त्याचा मित्र अरबाज यांनी किरण याला मारहाण केली. एकाने किरणच्या छातीवर लाथ मारली. मारहाणीत किरण बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मुकील आणि अरबाज पसार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दोघांना अटक करण्यात आली.सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक एस. टी. जगदाळे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *