पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] उत्तर अमेरिकेतील एका उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.पुणे शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील उद्यानात ही घटना घडली.येथील गुआदाल्युप रिव्हर पार्कमधून हा पुतळा चोरीला गेला आहे. सॅन जोसच्या उद्यान विभागाने शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केली आहे. आता या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.पुणे शहराची सिस्टर सिटी असलेल्या सॅन जोस शहरातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी झाली. ही बातमी येताच त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन जोस शहराला शिवाजी महाराजांचा पुतळा भेट दिला होता. तो पुतळा सॅन जोस शहरातील उद्यानात बसवण्यात आलेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *