थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरामध्ये श्री चिंतामणी जन्म सोहळ्याचे औचित्य साधून श्री संगीत श्री गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची सुरुवात काल मंगळवार रोजी झाली ह भ प चिंतामणी तारू महाराज यांच्या मधुर वाणी मधून श्री गणेशाच्या अवतारातील वेगवेगळ्या कथा यातून भाविकांना ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे यामध्ये श्री मुदगल पुराण व श्री चिंतामणी विजय ग्रंथाचे पारायण तसेच त्यावर संगीत निरूपण असा हा भरगच्च कार्यक्रम चालू आहे

       काल काल सायंकाळी संगीत गणेश कथा महात्म्य सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी गणपतीचे सर्वात महत्त्व विविध अंगाने विशद केले विशेष करून महाराष्ट्रातील संत विभोतींकडून गणेशांचे जे रूप साकारले आहे याचे सप्रमाण निरूपण ह भ प चिंतामणी तारू महाराजांनी सांगितले तसेच कथेला सुरुवात करताना नेहमी क्षारण्याच्या ठिकाणी विविध ऋषी सहवास करतात आणि तपश्चर्या करत असताना त्यांना संत सत्संगाची लालसा होते यातून शौनक ऋषी यांच्याकडे संत सूत यांच्या रूपाने तेथे दाखल झाले शौनक ऋषींनी त्यांची मनोभावे पूजन करून त्यांना आपल्या मनातील शंका विशद केल्या त्यावर आपल्या मनातील द्वंद्व नाहीसे व्हावे यासाठी त्यांनी महर्षी सुतांना प्रश्न केले यावर सूत शौनकांना म्हणाले की या सर्व सृष्टीचा निर्माता आदी गणपती असून त्यांच्यातील विविध गुणांमधून आदी पुरुष गुणेश्वराची निर्मिती झाली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांची निर्मिती करणारा गणेश याच्या दर्शनाची लालसा या दश इंद्रियांना झाली त्यावेळी श्री गणराज क्षणभर त्यांच्या समोर प्रकटले आणि अंतर्धान पावले त्यानंतर आपल्या आराध्याचे असे हे क्षणिक दर्शन त्यांना पुन्हा त्यांच्याकडे आकर्षित करून लागले यातून हे दश इंद्रिय एकमेकात विलीन झाल्याने यातून एक आकृती तयार झाली तीच गुणेश्वर या आद्यपुरुषाची आणि इथूनच वेगवेगळ्या वेदशास्त्र यांची निर्मिती झाली सुरुवातीला चार वेद निर्माण झाले.

असा हा कथेचा संदर्भ पार पडला आज शिवपार्वती विवाह सोहळा तसेच महागणपती कडून त्यांना आशीर्वचन हे कथानक पार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *