पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] रावेत येथील सोसायटीच्या जागेची 7/12वर नोंद करण्यासाठी किवळे गावच्या तलाठ्यासाठी 35 हजाराची लाच मागणार्‍या खाजगी इसमाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, किवळे गावच्या हद्दीतील एका सोसायटीची 7/12 वर नोंद करण्यासाठी खाजगी इसम नितीन ढमाले याने गाव कामगार तलाठी यांच्यासाठी 35 हजार रुपयाची मागणी केली तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दाखल केली यावर या विभागाकडून तलाठी कार्यालयात पडताळणी केल्यानंतर देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *