अहमदनगर [हवेलीनामा वृत्तसमुह] अहमदनगर शहरात लॉजवर राहून बस स्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरणारी परप्रांतीय टोळी कोतवाली पोलिसांनी गजाआड केली आहे त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार 500 रूपये किमतीचे आठ मोबाइल जप्त केले आहेत.अलिकडे मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याच्या पोलिसात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.गुप्त बातमीदाराकडून ज्यावेळी पोलिसांना चोरट्यांची माहिती मिळाली पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याकडून काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दिलबर नसरूद्दीन शेख, जॉनी मकवा, शोएब उंबर शेख, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे, माळीवाडा बसस्थानक परिसरातून अनेक मोबाइल चोरीला गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत.पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत चोरट्यांची माहिती काढली. मोबाइल चोरी करणारी परराज्यातील टोळी पंचपीर चावडी येथील लॉजवर राहत असल्याची माहिती तपासात उघड झाली.

तपास पथकाने लॉजवर जाऊन याबाबत खात्री केली असता परराज्यातील काही व्यक्ती तेथे राहत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील आठ मोबाइलही ताब्यात घेत ते कुठून चोरले असल्याची विचारणा केली असता त्यांनी ते बस स्थानक परिसरातून चोरले असल्याची कबूली दिली.त्यांच्यासोबत आणखी काही चोरटे असण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *