थेऊर (हवेलीनामा वृत्तसमुह) येथील ग्रामदैवत महातारीआई देवीचा वार्षिक उत्सवाची सांगता नुकतीच निकाली कुस्त्याच्या जंगी आखाड्याने झाली यात मानाची एक लाख एक हजारची इनाम असलेली कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व रोहतकचा (दिल्ली) चा पै.सोनूकुमार यांच्यात झाली यात अवघ्या दहा मिनिटात महेंद्र गायकवाड याने सोनूकुमारला चित करुन थेऊरचे कुस्ती शौकिनाच्या डोळ्याचे पारणे फेडले.यावेळी आखाड्यात एकच जल्लोष झाला. या कुस्ती आखाड्यात पंच म्हणून यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे,हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांनी काम पाहिले.यावर्षी प्रथमच सव्वीस निकाली कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते यात दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती बाला रफिक व माऊली जमदाडे यांच्यात अतिशय अटीतटीची झाली बराचवेळ दोघांनीही डावप्रतिडाव केले शेवटी माऊली जमदाडेनी बलाढ्य पै बाला रफिक याला पराभूत केले..

 श्री महातारीआई देवीची यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेस असते याही वर्षी ही यात्रा अतिशय उत्साहात पार पडली.यात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पौर्णिमेच्या दिवशी रात्री दहा वाजता देवीची पालखी मिरवणूक सोहळा (छबिना) पार पडला यात थेऊर येथील प्रसिध्द प्रभात बॅड, भारत बॅड,नवनाथ झांज पथक हे विशेष आकर्षण ठरले वाजतगाजत म्हतारीआई माता मंदीर ते गाव ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता सुरेखा पुणेकर यांचा ‘नटरंगी नार’ सदाबहार कार्यक्रम पार पडला त्यानंतर निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाडा सुरु झाला ग्रामीण भागातील यात्रेतील मोठे आकर्षण म्हणजे कुस्त्यांचे जंगी मैदान होय.कुस्ती म्हणजे शक्ती आणि युक्तीचे प्रदर्शन, यावेळी यशवंतचे माजी संचालक पंढरीनाथ पठारे,थेऊरचे माजी सरपंच तात्यासाहेब काळे, उपसरपंच आप्पासाहेब काळे,माजी पंचायत समिती सदस्य काळुराम कांबळे,माजी उपसरपंच दत्तात्रय कृष्णाजी कुंजीर,अष्टविनायकचे संचालक शरद काकडे,मुंबई महापौर केसरी आबा काळे,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,युवराज काकडे,राहूल कांबळे,माजी उपसरपंच विलास कुंजीर,नितिन कुंजीर,शहाजी जाधव,ज्ञानोबा कुंजीर,गोविद तारु,चंद्रकांत तारु,आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे, बहुजन दलित महासंघाचे आनंद वैराट, जगन्नाथ बोडके,गौतम काकडे, सोसायटीचे चेअरमन एकनाथ काळे,यशवंत कुंजीर,रमेश कुंजीर, आण्णा बोडके,सुखराज कुंजीर,तानाजी कुंजीर, गणेश रसाळ,बाळासाहेब शेडगे,सुरेश कांबळे,सुरेश चव्हाण,दत्ता तांबे,विजय कुंजीर,विजय कुंजीर,वैभव बडदे,निखिल कुंजीर, प्रकाश आळंदे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अनेक नामंकित्त मान्यवर पैलवान वस्ताद उपस्थित होते उपस्थित होते.लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दतात्रय चव्हाण,सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख,अमित घोडके,पोलिस हवालदार विजय जाधव,दिगंबर जगताप,विशाल बनकर,रामदास मेमाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुस्तीचे समालोचन निवेदक युवराज केचे यांनी केले.आलेल्या सर्व पैलवान तसेच कुस्ती प्रेमी पेक्षकांचे स्वागत व आभार थेऊर सार्वजनिक उत्सव कमेटीच्या वतीने करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *