पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पुढील वर्षात येऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी हालचालींना वेग आला असून मुळशी तालुक्यातील हिंजवडी पंचायत समिती गणातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतीच मारुंजी येथे पार पडली यावेळी तालुक्यातील जेष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.

         या आढावा बैठकीसाठी तालुक्याचे जेष्ठ नेते रामभाऊ हगवणे,मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे,सभापती पांडुरंग ओझरकर,उपसभापती विजय केदारी,जिल्हा परिषद सदस्य शंकरराव मांडेकर, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, सुरेश हुलावळे,युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, सागर साखरे,मल्हारी साखरे,गणेश गायकवाड, दत्तात्रय जाधव, गणपत जगताप,सुभाष बुचडे, सुहास दगडे,विशाल साखरे,मयूर साखरे,अमोल गायकवाड, महेश टेमगिरे,सचिन जाधव, दत्तात्रय बुचडे, श्याम हुलावळे, निलेश मांडेकर, राजेंद्र सुर्वे,लक्ष्मण कुंभार, श्रीकांत जाधव तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते रामदास पायगुडे यांनी सूञसंचालन केले तर कपिल बुचडे यांनी प्रस्तावना केली तसेच सदर बैठकीचे आयोजन करुन आभार हिंजवडी माण जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष समीर बुचडे यांनी व्यक्त केले केले होते.
          राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकासदर्भात कामाला लागावे यासाठी वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच हिंजवडी चा दौरा केल्याने पक्ष कार्यकार्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील वर्षी दुसऱ्या तिमाहीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यासाठी पक्ष्याच्या वतीने तयारी करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *