पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) धायरी पुणे येथील स्व.बबनराव मणेरे प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश भक्तांना २१०० गणेश मूर्तींचे मोफत वाटत करण्याचा संकल्प केला असून गणेशभक्तांनी दशरथ मणेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच यापैकी एका गणेशभक्तांस रु. ५१ हजार किमतीची सुवर्णमुद्रा दिली जाणार आहे.

        या उपक्रमाबद्दल सांगताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ मणेरे यांनी सांगितले की, कोरोना सारख्या महामारीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.तरीही हिंदू धर्मातील अनेक सण साजरे करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो. आपणही समाजाचे देने लागतो या भावनेतून २१०० गणेश मूर्तीचे वाटप करण्याचा संकल्प केला यासाठी पेण येथील सुप्रसिद्ध शाडू मातीच्या पर्यावरण पूरक गणपती बाप्पाच्या मूर्ती मागविण्यात आल्या आहेत, जिल्ह्यातील तमाम गणेश भक्तांनी यासाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात त्यांचे सहकारी दीपक चव्हाण, दिनेश चव्हाण, बाळासाहेब मणेरे, सचिन मणेरे,अभिजात दुधाने व विकास पोकळे यांचे सहकार्य लाभले.कोरोना काळात प्रतिष्ठानचे वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
       गणेशमूर्तीसाठी “दशरथ बबनराव मणेरे जनसंपर्क कार्यालय,गणेशनगर, धायरी, पुणे येथे संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *