मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] प्रत्येकाला चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते तसे प्रत्येक सर्वसामान्यांनाही आपलं स्वतःचं घर असावं अशी अपेक्षा असते म्हणून मोठ्या घरांसोबत सर्वांना परवडतील अशी घरे ही बनवावीत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले येत्या दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करणार आहोत त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डे मुक्त करणार असल्याचे सुतवाच त्यांनी यावेळी केले.
ते एका गृह बांधणी प्रकल्पाच्या प्रदर्शनात उद्घाटन प्रसंगी बोलत होते गृहनिर्माण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुण येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे या क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याची गरज लागणार असून राज्य सरकार या व्यवसायासाठी सर्वतोपरी सहाय्यक करेल कोरोना महामारीच्या काळात या क्षेत्राने राज्य सरकारला खूप सहकार्य केले विशेषतः ग्लोबल कोविड हॉस्पिटल व इतर रुग्णालय उभारणीसाठी मोलाचे सहकार्य लाभले ज्या शहरात आपण व्यवसाय करतो काम करतो त्या शहरासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून एम सी एच आय ने काम केले आहे राज्य सरकार मी नगर विकास मंत्री असताना एकात्मिक सार्वजनिक समावेशक विकास नियंत्रण अप्रोत्साह नियमावली तयार केली या नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळाली आहे अनेक प्रकल्प सुरू होण्यास मदत झाली आहे त्यामुळे या नियमावलीचा फायदा सर्वसामान्य नाही व्हायला हवा त्यासोबतच कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला बसलेल्या आर्थिक फटक्यातून हे क्षेत्र सावरण्यासाठी स्टॅम्प ड्युटी व प्रीमियम मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
