लोणावळा [हवेलीनामा वृत्तसमुह] लोणावळा उपविभागीय पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना तसेच, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये पुणे ते मुंबई एक्स्प्रेस महामार्गावर मौजे कुसगांव ता. मावळ, जि.पुणे गावात मुंबई बाजुकडे जाणाऱ्या मार्गिकेवर .आय. आर.बी. कार्यालयाचे समोरील बाजूस सापळा रचुन कर्नाटक राज्यामधून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा ट्रक नं.. KA 32 AA 1138 यास दोन पथके करुन पकडून पाहणी केली त्यामध्ये १०,६७,०४० /- रुपयांची गुटख्याच्या पुडयांनी भरलेली ३४२ पोती व १५,००,००० /- रुपयांचा ट्रक नं. KA 32 AA 1138 असा एकुण २५,६७,०४० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषण प्रशासन, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध, पुणे यांना दिलेल्या पत्राच्या आधारे त्यांनी १) मोहम्मद खलील जमाल अहंमद शेख, (ट्रक चालक), वय ४० वर्षे, रा. मश्जितजवळ लालगीरी, ता. बहामपूर, जि.गुलबर्गा, राज्य कर्नाटक, २) नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे, (ट्रक क्लिनर), वय ३५ वर्षे, रा. खडखडीगल्ली डुबलगुंडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर, राज्य कर्नाटक, ३) सदाम उर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर (ट्रक मालक), रा. मुल्ला गल्ली, नरोना गुलबर्गा, नरोना गुलबर्गा, कर्नाटक यांचेविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अंकीत गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, सत्यसाई कार्तीक, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे, स्वप्नील अहिवळे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, पोलीस नाईक अमोल शेडगे, पोलीस शिपाई सुभाष शिंदे, अंकुश पवार, अक्षय सुपे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *